विविध पूजा / विधी

१६ संस्कार

आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ठराविक टप्प्यांवर १६ संस्कार करण्याचा आग्रह आढळतो. संस्कार म्हणजे जन्मजात असणारे विकार (दुर्गुण) दूर करुन अधिक सुदृढ व निर्दोष व्यक्तीमत्व घडविण्यासाठी केलेला प्रयत्नपूर्वक विधी. प्रत्येक व्यक्तीचे जीवन आरोग्यपूर्ण, सुसंस्कृत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्तीमत्व निर्माण व्हावे. त्यापासून चांगल्या समाजरचनेची पायाभरणी व्हावी व त्यायोगे एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा या संस्कारां मागील प्रमुख उद्देश आहे. हे संस्कार बालक जन्माला आल्यानंतरच नव्हे तर गर्भधारणा होण्यापासून करण्याचे आहेत. ह्यातून समाजमान्य व विचारपूर्वक संततिप्राप्ति होणे हे सुद्धा त्याकाळात अपेक्षित होते.

हे संस्कार कोणत्याही वर्णव्यवस्थेत अडकून न रहाता समाजातील सर्व लोकांसाठी आवश्यक आहेत. येथे वर्ण म्हणजे जन्मजात जातीव्यवस्था अपेक्षित नसून कार्यानुरुप वर्ण अपेक्षित आहे. उदा. बौद्धिक क्षेत्रात काम करणारा ब्राह्मण, शक्ती अथवा शारिरिक कष्टांशी निगडीत व्यवसाय करणारा तो क्षत्रिय इ. अपेक्षित आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सोळा संस्कार (षोडश संस्कार) पुढीलप्रमाणे :

 • गर्भाधान
 • पुंसवन
 • अनवलोभन
 • सीमंतोन्नयन
 • जातकर्म
 • नामकरण
 • सूर्यावलोकन
 • निष्क्रमण
 • अन्नप्राशन
 • वर्धापन
 • चूडाकर्म (चौल)
 • अक्षरारंभ
 • उपनयन
 • समावर्तन
 • विवाह
 • अंत्येष्टी

१६ संस्कार विषयी माहिती डाऊनलोड करा