विविध पूजा / विधी

पार्थिव गणेश स्थापना

२२ ऑगस्ट २०२०

हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर

गूळ-खोबरे

समई, नीरंजन

अष्टगंध, अक्षता, रांगोळी

वाती, काडेपेटी

पळी भांडे, तांब्या, ताम्हण

नारळ १

हार, फुले, केवडा, कमळ

सुट्टे पैसे ५ नाणी

जानवे

दूर्वा, बेल , तुळशी , पत्री

पाट / आसने

खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुंडे (प्रत्येकी५)

विड्याची पाने १५

पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर)

उदबत्ती, कापूर

फळे ५

पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर)

गणपतीचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल अशी आरास करावी. क्वचित उत्तरेला चालेल परंतु त्यावेळी पूजा करणाऱ्या व्यक्तीने तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल असे बसावे.

गणपतीसमोर २ पानांचे ५ विडे मांडावेत. देठ देवाकडे करावेत. त्यावर खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुंडे व सुट्टे पैसे ठेवावेत. आपल्या समोर डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा . डाव्या हाताशी पळी- भांडे ताम्हण व उजव्या हाताला पूजा साहित्याचे ताट ठेवावे. गणपतीच्या मूर्ती खाली पाटावर वस्त्र घालावे व थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. ही सर्व तयारी पुरेशी आधी करावी म्हणजे पूजेच्या वेळी धावपळ / चिडचिड होणार नाही.

Ganesh Sthapana

आचमन :

डाव्या हातात पळी (चमचा) घेऊन उजव्या हातावर पाणी घ्यावे. पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे

१) केशवाय नमः      २) नारायणाय नमः      ३) माधवाय नमः     

चवथ्या नावाला पाणी हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.

४) गोविंदाय नमः।

पुन्हा पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे चवथ्या नावाला हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.

१) केशवाय नमः      २) नारायणाय नमः      ३) माधवाय नमः      ४) गोविंदाय नमः।

नंतर पुढील २० नावे म्हणावीत.

०५. विष्णवे नमः।

०६. मधूसूदनाय नमः। 

०७. त्रिविक्रमाय नमः।

०८. वामनाय नमः। 

०९. श्रीधराय नमः।

१०. हृषीकेषाय नमः।

११. पद्मनाभाय नमः।

१२. दामोदराय नमः।

१३. संकर्षणाय नमः । 

१४.वासुदेवाय नमः।

१५. प्रद्युम्नाय नमः।

१६.अनिरुद्धाय नमः।

१७.पुरुषोत्तमाय नमः।

१८. अधोक्षजाय नमः।

१९. नारसिंहाय नमः।

२०. अच्युताय नमः।

२१.जनार्दनाय नमः।  

२२.उपेंद्राय नमः।

२३. हरये नमः।

२४. श्रीकृष्णाय नमः।

यानंतर मनामध्ये गणपती, कुलदेवता, आई वडिल गुरुंचे स्मरण करुन नमस्कार करावा. एक विडा देवापुढे ठेवून देवांना व मोठ्या माणसांना नमस्कार करावा व पूजेला सुरुवात करावी.
श्रीमन्महागणपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। एतद् कर्मप्रधानदेवता श्रीपार्थिव सिद्धीविनायकाय नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अविघ्नमस्तु।

संकल्प : आता उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा.
श्रीमद् भगवतो महापुरुषस्य ववष्णोराज्ञया प्रवतामानस्य अद्म ब्रह्मणो वितीये पराधे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वुंतरे कवलयुगे प्रिमचरणे भरतवषे भरतखण्डे जम्बूद्वीपे दुंडकारण्ये देशे गोदावयााः दवक्षणे तीरे कृष्णा वेण्ण्याः उत्तरे तीरे (पुण्याबाहेरील गणेश भक्तानी ह्मा ठिकाणी आपण ज्या गावी पूजा करत आहात त्या गावाचा उल्लेख करावा) शावलवाहन शके बौद्धावतारे रामक्षेत्रे राम रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने शार्वरी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां तिथौ मंद वासरे हस्त दिवस नक्षत्रे कन्या राशि स्थिते चंद्रे सिंहराशिस्थिते सूर्ये धनु राशि स्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथा राशिस्थानानि स्थितेषु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं (आपल्या गोत्राचा उच्चार करावा; गोत्र माहित नसल्यास काश्यप गोत्र घ्यावे किंवा आडनावाचा उच्चार करावा) ............. गोत्रे उत्पन्नः (आपल्या नावाचा उच्चार करावा ) ............ अहं अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं श्री सिद्धिविनायक कृपाप्रसाद प्राप्त्यर्थं प्रति वार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक व्रत अंगत्वेन श्री पार्थिव सिद्धीविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ति यथाज्ञानेन यथामिलित सामग्र्यां प्राणप्रतिष्ठापना पूर्वकं ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनं अहं करिष्ये । हातावर पाणी घेऊन अक्षता ताम्हणात सोडाव्यात. आदौ निर्विघ्नता सिद्यर्थं महागणपति पूजनं/स्मरणं करिष्ये । पुन्हा एकदा हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.

(आमच्या घरातील सर्वांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुख-शांति, समाधान, ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून मी हे व्रत करत आहे, अशी भावना मनात ठेवावी.)

उजव्या हाताला तांदळावर एक सुपारी ठेवून त्याची गणपती समजून पुजा करावी. किंवा शक्य नसल्यास फक्त गणपतीचे स्मरण करुन नमस्कार करावा.

श्री महागणपतये नमः । ध्यायामि । सुपारीला अक्षता वहाव्यात.
श्री महागणपतये नमः । आवाहयामि। पुन्हा अक्षता वहाव्यात.
श्री महागणपतये नमः । गंध अक्षता पुष्पं समर्पयामि । एक फूल गंध अक्षतात बुडवून वहावे
श्री महागणपतये नमः । हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि । हळदी कुंकु वहावे.
श्री महागणपतये नमः । दुर्वांकुरं विल्वदलं पुष्पाणि च समर्पयामि । दुर्वा, बेल व फुले वहावीत.
श्री महागणपतये नमः । धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि । उदबत्ती नीरांजन ओवाळावे / दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे.
श्री महागणपतये नमः । गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि । गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
श्री महागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं सुवर्ण पुष्प दक्षिणां समर्पयामि । पुढच्या विड्यावर व फळावर थेंबभर पाणी घालावे.
श्री महागणपतये नमः । मंत्राक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात.
श्री महागणपतये नमः । प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि । नमस्कार करावा.
अनेन कृत पूजनेन श्री महागणपती प्रीयताम् । हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.

ह्यानंतर कलश, शंख, घंटा व दिव्याची गंध अक्षता फूल वाहून पूजा करावी व नमस्कार करावा.
पूजा केलेल्या कलशातील पाणी फुलाने किंवा तुळशीच्या पानाने स्वतःच्या अंगावर, मूर्तीवर आणि पूजा साहित्यावर शिंपडावे. नंतर गणपतीच्या मूर्तीवरील रुमाल/वस्त्र काढावे व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

प्राणप्रतिष्ठापना :

सर्व प्रथम ह्या निर्जीव असणाऱ्या मातीच्या मूर्तीत देवाचे हात,पाय, डोळे इ. एकेक अवयव साकार होत आहेत आणि मूर्तीमध्ये प्राण येऊन ती सजीव होत आहे अशी मनामध्ये भावना करावी.मूर्तीच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवावा व पुढील मंत्र म्हणावा.

औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणाः ॥
औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः ॥
औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ सर्वे इंद्रियाणि सुखं चिरं तिष्ठंतु नमः ॥

गर्भादानादि पंधरा संस्कार पूर्ण व्हावेत म्हणून पंधरा वेळा ‘-हीं ’ चा जप करावा .
नंतर देवाच्या दोन्ही डोळ्यांना दूर्वाच्या काडीने तूप लावावे.


’श्री सिद्धिविनायकाय नमः ’ असे म्हणत गंध अक्षता फूल हळदी-कुंकु वहावे.
’श्री सिद्धिविनायकाय नमः ’ धूप समर्पयामि । दीपं दर्शयामि । असे म्हणत दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे.

गूळखोबरे अथवा खडीसाखर किंवा साध्या साखरेचा नैवेद्य दाखवावा.
पुढच्या विड्यावर पाणी सोडून देवाला नमस्कार करावा.
अनेन कृत पूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् । असे म्हणून ताम्हणात एकदा पाणी सोडावे.

षोडशोपचार पूजन :

हातामध्ये दूर्वा किंवा अक्षता घेऊन मनामध्ये सिद्धिविनायकाचे ध्यान करावे.
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। ध्यायामि । दूर्वा किंवा अक्षता गणपतीच्या मूर्तीवर वहाव्यात.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पाद्यं समर्पयामि । फुलाने / दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अर्घ्यं समर्पयामि । गंध अक्षता मिश्रित पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आचमनीयं समर्पयामि । फुलाने / दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। स्नानं समर्पयामि । फुलाने / दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पंचामृत स्नानं समर्पयामि । फुलाने पंचामृत शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। गंधोदक स्नानं समर्पयामि । फुलाने गंधमिश्रित पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामि । फुलाने/दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पूजार्थे गंध अक्षता पुष्पं समर्पयामि । देवाला गंध, अक्षता, फूल वहावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि। हळदी कुंकु वहावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि । उदबत्ती निरंजन ओवाळून
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यं समर्पयामि। पंचामृताचा नैवेद्य दाखवावा
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पूगीफल तांबूल सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि। पुढच्या विड्यावर पाणी घालावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्राक्षतां समर्पयामि। अक्षता वहाव्यात.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि। देवाला नमस्कार करावा.
अनेन पंचामृत पूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् । ताम्हणात एक पळीभर पाणी सोडावे.

अभिषेक :

देवाला वाहिलेले फूल उचलून त्याचा वास घेऊन उत्तर दिशेला टाकावे व अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र ( प्रणम्य शिरसा देवं ..) म्हणत देवाला अभिषेक करावा. दोन्ही येत नसल्यास २१ वेळा ’ गं गणपतये नमः’ असे म्हणत अभिषेक करावा.
नंतर देवाला फुलाने वासाचे तेल किंवा अत्तर लावून किंचित गरम पाणी शिंपडावे व पुन्हा चांगले पाणी शिंपडावे.
मूर्ती हलक्या हाताने स्वच्छ पुसुन जागेवर ठेवावी. पुढील पूजा करण्यापूर्वी मूर्ती नीट योग्य ठिकाणी बसली आहे ह्याची खात्री करावी.

कोणत्याही कारणास्तव पुन्हा मूर्ती हलवू नये.

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। सुप्रतिष्टितमस्तु । ( अक्षता वहाव्यात )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। वस्त्र उपवस्त्रं समर्पयामि । ( प्रत्यक्ष वस्त्र किंवा अक्षता वहाव्यात)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि । (चित्रात दाखविल्याप्रमाणेganesh image देवाच्या डाव्या खांद्यावरुन उजवीकडे जानवे घालावे. नसल्यास अक्षता वहाव्यात.)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । ( गंध लावावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि । ( अक्षता वहाव्यात )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि । ( हळदी कुंकु वहावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध परिमल द्रव्याणि समर्पयामि । (शेंदूर, गुलाल, बुक्का इ. वहावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध पुष्पाणि पुष्पमालां च समर्पयामि । ( फुले वहावीत व हार घालावा )

अंगपूजा :

खालील नावांनी गणपतीला पायापासून डोक्यापर्यंत एकेका अवयवावर अक्षता वहाव्यात.

१.   गणेश्वराय नमः ।

पादौ पूजयामि 

२.   विघ्नराजाय नमः ।

जानुनी पूजयामि  

३.  आखुवाहनाय नमः।   

ऊरु पूजयामि  

४.   हेरंबाय नमः।

कटिं पूजयामि   

५.   लंबोदराय नमः। 

उदरं पूजयामि

६.   गौरीसुताय नमः ।

स्तनौ पूजयामि     

७.   गणनायकाय नमः ।

हृदयं पूजयामि

८.   स्थूलकंठाय नमः ।

कंठं पूजयामि  

९.   स्कंधाग्रजाय नमः ।

स्कंधौ पूजयामि  

१०. पाशहस्ताय नमः ।

हस्तौ पूजयामि

११. गजवक्त्राय नमः ।

वक्त्रं पूजयामि     

१२. विघ्नहर्त्रे नमः ।

ललाटं पूजयामि

१३. सर्वेश्वराय नमः।

शिरः पूजयामि

१४. गणाधिपाय नमः।

सर्वांगं पूजयामि

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध पत्राणि समर्पयामि । ( पत्री वहाव्यात )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि । दीपं दर्शयामि । ( उदबत्ती व निरंजन ओवाळावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यं समर्पयामि । ( पंचखाद्य / मोदक किंवा पेढे यांचा नैवेद्य दाखवावा )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। उत्तरापोशनं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि। ( तीन वेळा ताम्हणात पाणी सोडावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि । ( फुलाने गंध वहावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि। ( पुढच्या विड्यावर पाणी घालावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। सुवर्ण पुष्पं दक्षिणां समर्पयामि । ( देवापुढे दक्षिणा ठेवून पाणी घालावे)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। फलं समर्पयामि । ( नारळावर व फळांवर थेंब थेंब पाणी घालावे )

पुढील प्रत्येक नावाला दोन-दोन दूर्वा गंधात बुडवून वहाव्यात.

१   गणाधिपाय नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि । 

२  उमापुत्राय नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि ।

३  अघनाशनाय नमः। 

दूर्वा युग्मं समर्पयामि । 

४   विनायकाय नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि ।

५  ईशपुत्राय नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि ।

६   सर्वसिद्धिप्रदायकाय नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि ।   

७  एकदंताय नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि । 

८   इभवक्त्राय नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि ।

९  आखुवाहनाय नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि ।

१० कुमार गुरवे नमः।

दूर्वा युग्मं समर्पयामि ।

पुढील दोन मंत्रांनी एक दूर्वा वहावी.
गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्र अघनाशन। एकदंत इभवक्त्रेति तथा च मूषक वाहन ॥
विनायक ईशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमार गुरवे नित्यं पूजनीय प्रयत्नतः ॥ दुर्वामेकां समर्पयामि ।

यानंतर निरांजन / कापूर लावून आरती करावी.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रदक्षिणापूर्वक नमस्कारं समर्पयामि । ( प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि । ( हातात फुले व अक्षता घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणून ती फुले वहावीत. मंत्रपुष्पांजली येत नसल्यास ’वक्रतुंड महाकाय ...... ’ श्लोक म्हणावा )

यानंतर पुढील मंत्र म्हणून नमस्कार करावा.
आवाहनं न जानामि न जानामि तव अर्चनं । पूजां चैव जानामि क्षम्यतां परमेश्वर ॥
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि ।

(पूजा कशी करायची मला माहित नाही. जसे माझ्या मनात आले तशी मी केली. काही चुकले असेल राहिले असेल तर माफ करा आणि सर्वांच्या घरात कायम सुख शांती समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करावी.)

सर्वांनी श्रद्धापूर्वक तीर्थ प्रसाद घ्यावा.

पूजेचे संपूर्ण फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना दक्षिणा व तुपात तळलेल्या मोदकाचे वायन द्यावे.
ही दक्षिणा आपण Sumeet G. Dhere. State Bank of India, Pashan Branch, IFSC Code SBIN0013547 Saving A/C 20152659380 ह्या खात्यावर जमा करु शकता. अथवा 9822865216 ह्या क्रमांकावर Paytm/BHIM/GooglePay करु शकता.

दररोजची पूजा :

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पाद्यं समर्पयामि । (फुलाने / दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अर्घ्यं समर्पयामि । (गंध अक्षता मिश्रित पाणी शिंपडावे.)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आचमनीयं समर्पयामि । (फुलाने/ दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। स्नानं समर्पयामि । (फुलाने/ दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.)
अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र ( प्रणम्य शिरसा देवं ..) किंवा २१ वेळा ‘गं गणपतये नमः’ असे म्हणत अभिषेक करावा. (फुलाने/ दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.) ( मूर्ती हलक्या हाताने स्वच्छ पुसावी )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । ( गंध लावावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि । ( अक्षता वहाव्यात )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि । ( हळदी कुंकु वहावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध पुष्पाणि पुष्पमालां च समर्पयामि । ( फुले, दूर्वा वहाव्यात व हार घालावा )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि । दीपं दर्शयामि । ( उदबत्ती व निरंजन ओवाळावे )
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यं समर्पयामि । ( नैवेद्य दाखवावा)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आर्तिक्यदीपं समर्पयामि । (आरती करावी )

उत्तरपूजन :

श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ती उत्तरपूजनं अहं करिष्ये असा संकल्प सोडून गंध, अक्षता, फुले, दुर्वा वाहून पूजा करावी. उदबत्ती निरंजन ओवाळून दही पोहे / दही भात किंवा खिरापत इ. नैवेद्य दाखवावा व आरती करावी.
यांतु देवगणाः सर्वे पूजां आदाय पार्थिवीम् । इष्ट कामना सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥

ह्या मंत्राने अक्षता वाहून मूर्ती थोडीशी उत्तर दिशेला हलवावी. नंतर विसर्जनाकरिता नदी अथवा जलाशयावर घेऊन जावी.

गणेशस्थापना पुजेची माहिती डाऊनलोड करा