विविध पूजा / विधी

साठीशांत / पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन इ.

प्रत्येक व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार परमेश्वराने त्या व्यक्तीची जीवनमर्यादा (आयुष्यमान) निश्चित केलेली असते. साधारणपणे मानवाचे आयुष्य हे १०० वर्षे मानले गेले आहे. त्याच्या तीन अवस्था असतात. जन्मापासून २५ वर्षांपर्यंत बालपण, २५ ते ५० पर्यंत तारुण्य तर ५० च्या पुढे वार्धक्य.

ह्या तिस-या अवस्थेपर्यंत शरीराची झीज होत होत मनुष्य थकत आलेला असतो. काही शारीरिक / मानसिक आघात, आजार, शिक्षण अथवा नोकरीच्या निमित्ताने मुलाबाळांपासून दुरावा , पती-पत्नी अथवा इतर आप्त स्वकीयांचा वियोग, नजर किंवा श्रवणशक्ती कमी होणे इ. विकार यांनी माणूस खचलेला असतो. अशा अरिष्टांचे निवारण व्हावे व उर्वरित आयुष्य सुखात जावे म्हणून काही धार्मिक कृत्ये शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. ज्यायोगे वरील सर्व विकारांचा कठोरपणा कमी होवून मन स्थिर होते व आत्मविश्वास वाढतो.

यासाठी धर्मशास्त्रामध्ये वयाच्या पन्नासाव्या वर्षापासून दर पाच वर्षांनी विशिष्ट शांति करावयास सांगितले आहे.त्या पुढील प्रमाणे

५०

वैष्णवी शांत

८०

चांद्री शांत/ सहस्रचंद्रदर्शन

५५

वारुणी शांत

८५

रौद्री शांत

६०

उग्ररथ शांत / साठी शांत

९०

सौरी शांत

६५

मृत्युंजय- महारथी शांत

९५

त्र्यंबक महारथी शांत

७०

भैमरथी शांत

१००

महामृत्युंजय शांत

७५

ऐन्द्री शांत/ पंचाहत्तरी शांत

 

 

परंतु सध्या साठी शांत, पंचाहत्तरी व सहस्रचंद्रदर्शन ह्या महत्त्वाच्या शांति फक्त केल्या जातात. त्याचा विधी थोडक्यात पुढीलप्रमाणे :

सर्वप्रथम संकल्पपूर्वक गणपतीपूजन, पुण्याहवाचन केले जाते. त्यानंतर गुरुजींना पुढील कार्याची वर्णी दिली जाते. जी शांत असेल त्याप्रमाणे देवतास्थापन, नवग्रह स्थापन व पूजन केले जाते. त्यानंतर अग्निस्थापन करुन आवाहित देवतांना उद्देशून हवन केले जाते. बलिदान, पूर्णाहुती करुन पूजन केलेल्या कलशातील अभिमंत्रित केलेले पाणी यजमान व इतर कुटुंबियांवर शिंपडून अभिषेक केला जातो. अग्निची प्रार्थना करुन विभूती/ अंगारा धारण केला जातो. नंतर आयुष्य वृद्धिंगत व्हावे म्हणून तीळ-गूळ मिश्रित दूध पिऊन तुपामध्ये स्वतःचे मुखावलोकन करुन ते तूप व इतर दश-दाने किंवा त्याप्रीत्यर्थ यथाशक्ती दक्षिणा गुरुजींना द्यावीत. दशदाने पुढीलप्रमाणे गाय, भूमि, तिल, सुवर्ण, वस्त्र, धान्य, गूळ, मीठ, लोह व ऊर्णावस्त्र (लोकरीचे वस्त्र) . त्यानंतर यजमानांच्या मुला-मुलींनी यजमानांना पुष्पमाला, वस्त्रे, भेटी देऊन त्यांना सन्मानित करावे व जितकी वर्षे वय तितके दिवे लावून सुवासिनींनी औक्षण करावे. नंतर सर्वांनी यजमानांना दीर्घायुष्य व अखंड आरोग्य चिंतून शांतीची समाप्ती करावी.

ह्या प्रसंगानिमित्त यजमानांची तुला करुन ते धान्य अथवा वस्तू भेट म्हणून गुरुजी, नातेवाईक अथवा गरजू व्यक्तींना द्यावी. वेदाध्ययनाचे पवित्र कार्य करणा-या वेदपाठशाळा किंवा वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अथवा वृद्धाश्रमासाठी सुद्धा यानिमित्त मदत देता येते. (अशा मदतीसाठी गुरुजींशी संपर्क साधावा जेणेकरुन योग्य ठिकाणी मदत दिली जाईल.)

या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)

चौरंग - ३

तांदूळ - २ कि.

पिवळी मोहरी २५ ग्रॅम, काळे उडीद ५० ग्रॅम

पाट - ४

गूळ - खोबरे

दर्भ १ गड्डी

आसने - ६

साखर -अर्धा कि.

हळद, कुंकु, गुलाल, रांगोळी, अष्टगंध, उदबत्ती , कापूर

समया - २

पेढे-बर्फी - अर्धा कि

सुपा-या :१७५, हळकुंडे-१५, खारका :१५, बदाम : १५, समिधा -२००

नीरांजन -२

दूध -  पाव लि. 

वस्त्र :   धोतर जोडी : १ , उपरणे जोडी : १, ब्लाऊजपीस : ४

तांब्या/कलश - ४

दही - पाव कि.,   गायीचे तूप -अर्धा कि. 

पावशेर तांदळाचा शिजविलेला भात

ताम्हण - ४

तेल - अर्धा लि.  

हळद घालून मळलेल्या कणकेचे दिवे १ मोठा व ८ लहान  वयाप्रमाणे (६०/ ७५/८१ वगैरे)

पळी-भांडे -२

काड्यापेटी - १                                     

होमकुंड किंवा  विटा

स्टील ताटे -५

गुरुजींना देण्यासाठी आहेर, घरचा आहेर (पूजेला बसणा-या पती-पत्नीना देण्यासाठी)

माती/वाळू - १ घमेलं

स्टील डिश - ५

यजमानांसाठी मोठा हार , लहान हार -२ फुले -पाव कि.

बंबफोड / सरपण :- २ किलो

वाट्या/द्रोण -१०

बेल,दूर्वा, तुळशी,विड्याची पाने :५०

शेणाच्या गोव-या २

फुलपात्री - ५

आंब्याचे डहाळे

शेण, गोमूत्र

चमचे -५

फळे : ५ प्रकारची प्रत्येकी २,   केळी : ६, नारळ : ४

 

गहू - २ कि.

सुट्टे पैसे :  २५ नाणी

 

साठीशांत/पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन इ. पुजेची माहिती डाऊनलोड करा