विविध पूजा / विधी

सत्यांबा पूजा

सत्यनारायण, सत्यविनायकाप्रमाणेच शीघ्र फळ देणारे शाक्त पंथीयांमध्ये ( देवी भक्तांमध्ये) प्रसिद्ध असणारे हे देवीचे व्रत आहे. सर्व सृष्टीची निर्मिती जिच्यापासून झाली अशी जगन्माता असणा-या महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती स्वरुप देवीची ही पूजा आहे. ह्या व्रताचा महिमा साक्षात देवी भागवत व भविष्योत्तर पुराण ह्या पुराणांमध्ये वर्णिलेला आहे. ह्या व्रताच्या प्रभावानेच स्वतः भगवान शंकर संकटापासून मुक्त झाले व त्यांचा पुत्र कार्तिकस्वामी ह्यास असुरांशी झालेल्या युद्धात विजय प्राप्त झाला असा इतिहास प्रसिद्ध आहे.

केळीच्या खुंटांच्या साह्याने सुशोभित केलेल्या मंडपात ( चौरंगावर ) गणपती पूजन, वरुण पूजन करावे. कलशावर ठेवलेल्या ताम्हणामध्ये मध्यभागी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांचे आवाहन करावे. त्यांच्या भोवती सप्तमातृका, नवग्रह व आठ दिक्पालांचे आवाहन व पूजन करावे. नंतर सोन्याच्या किंवा चांदीच्या प्रतिमेवर अथवा देवीच्या मूर्तीवर सत्यांबेचे आवाहन करावे. देवीची पंचामृत स्नान, अभिषेक वगैरे करुन षोडशोपचार पूजा करावी. देवीला यथाशक्ती वस्त्र व सौभाग्य अलंकार (फणी, करंडा, मणी मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, आरसा इ.) अर्पण करावेत. नंतर देवीची नामपूजा व अंगपूजा करावी. हार, फुले, वेणी, पत्री इ. अर्पण करावेत. नंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये विशेषतः खव्याची पक्वान्ने, खीर व केशर मिश्रित रव्याचे लाडू असावेत. देवीसमोर भजन, कीर्तन, नृत्य-गायन वगैरे करावे.

या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)

हळद, कुंकु, गुलाल, बुक्का, अष्टगंध

मध

वस्त्र (ब्लाऊजपीस) १

चौरंग १

रांगोळी

अत्तर

सुतळी,

पाट किंवा आसने ३

नारळ २

जानवीजोड

सुतळी,

समई , निरंजन

सुपाऱ्या ४०

कापूर

केळीचे खुंट ४

पळी भांडे,

हळकुंडे ५

उदबत्ती

केळी६, फळे ५

तांब्या (कलश) २

बदाम ५

गहू १ कि., तांदूळ १ कि.

हार २, सुट्टी फुले

ताम्हण २

खारका ५

(गहू नसल्यास तांदूळ २ कि.)

बेल, दुर्वा, तुळशी

स्टील ताटे / ट्रे २

तेल,तुप

गूळ खोबरे

विड्याची पाने २५

वाट्या ८

वाती, फुलवाती

खडीसाखर, पेढे

आंब्याचे डहाळे,पत्री

घंटा, गणपती मूर्ती

काड्यापेटी

सुट्टे पैसे १० नाणी

नैवेद्य

देवीचा फोटो

हात पुसण्यासाठी व देव पुसण्यासाठी वस्त्र किंवा नॅपकिन २

पंचामृत ( दही, दूध, तूप, साखर, मध )

सत्यांबा पूजेची माहिती डाऊनलोड करा