विविध पूजा / विधी

वास्तुशांत

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वास्तुशांत करुन घरामध्ये प्रवेश करणे कधीही श्रेयस्कर ठरते. कारण आपण केलेल्या बांधकामादरम्यान विटा-माती, वाळू-सिमेंट इ. कालवत असताना काही जीव जंतूंची हत्या होते, झाडे तोडली जातात किंवा इतर काही दोष रहातात ते दूर करुन नवीन वास्तुमध्ये सुख-शांति, समृद्धी रहावी म्हणून ही पूजा केली जाते.

सुयोग्य मुहुर्तावर गणपतीपूजन, कलशपूजन व पुण्याहवाचन केले जाते. यानंतर आपल्या वास्तुमध्ये वास करणा-या वास्तुपुरुषासह ६४ देवतांची पूजा तसेच नवग्रहांची पूजा केली जाते. यानंतर या सर्वांना उद्देशून अग्निमध्ये आहुती दिल्या जातात. नंतर वास्तुमंडल देवता, नवग्रह यांच्यासाठी बलिदान तसेच क्षेत्रपालाची पूजा करुन त्यांना दही-भात, काळे उडीद यांचा बलि दिला जातो. नंतर पूर्णाहुती व देवतांची उत्तरपूजा केली जाते. पूजा केलेली वास्तुपुरुषाची प्रतिमा, सप्तधान्य व रत्न घरातील आग्नेय कोप-यात जमिनीखाली/फरशीखाली पुरली जाते. यालाच वास्तु-निक्षेप असे म्हणतात.

आपण जर एखादे जुने घर विकत घेतले असेल व आधीच्या मालकाने वास्तुशांत केलेली असेल तर वास्तुप्रतिमा न पुरता उर्वरित वास्तुशांत अवश्य करावी.

वास्तुशांतिनंतर घरात शुभ ऊर्जा टिकून रहावी म्हणून दरवर्षी वास्तुपुरुषाला उद्देशून हवन अथवा इतर कोणतीही हवनात्मक पूजा करावी.

काही कारणास्तव वास्तुशांत करणे शक्य नसल्यास किमान उदकशांत करावी व नंतर सवडीनुसार वास्तुशांत करावी.

या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)

घरातील तयारी

किराणा साहित्य

ओली तयारी

नवीन भांडी, वस्त्र

इतर तयारी

चौरंग - ३

गहू - ३ कि.

पेढे-बर्फी - अर्धा कि

लहान कलश - ४

होमकुंड किंवा  विटा

पाट - ४

तांदूळ - ३ कि

दूध -  अर्धा लि.

लहान ताम्हणे - ४

माती/वाळू

आसने - ६

गूळ - पाव कि.

दही - पाव कि.

तांब्याची कळशी -१

बंबफोड / सरपण :- ५ कि.

चटई / सतरंजी १

खोबरे -पाव कि.

फुले -अर्धा कि.

सुती (कॉटन) धोतर : २

शेणाच्या गोव-या ४

समया - २

साखर -अर्धा कि.

बेल,दूर्वा, तुळशी

उपरणी ४

शेण, गोमूत्र

नीरांजन -२

गायीचे तूप -अर्धा कि. 

विड्याची पाने : ७५

ब्लाऊजपीस   : ८

समिधा - २००

तांब्या/कलश - २

तेल - अर्धा लि.

आंब्याचे डहाळे

लाल कापडाचे झेंडे ४

तोरण

ताम्हण - २

काड्यापेटी - १

फुलांचे तोरण किंवा मोठा हार

काठ-पदराची साडी : १

गणपती चित्र / स्टिकर

पळी-भांडे -२

सप्त धान्ये १०० ग्रॅम

लहान हार - ५

घरचा आहेर

काळी बाहुली

स्टील ताटे -५

पिवळी मोहरी २५ ग्रॅम

दर्भ १ गड्डी

गुरुजींना आहेर

सूतगुंडी १

स्टील डिश - ५

काळे उडीद ५० ग्रॅम

फळे : ५ प्रकारची प्रत्येकी ३

वास्तुपुरुष प्रतिमा

सुट्टे पैसे :  २५ नाणी

वाट्या -१० 

तांबडे तीळ पाव कि.

बेलफळ १

सूर्य प्रतिमा

काळ्या कापडाची वात १

फुलपात्री - ५

हळद, कुंकु, गुलाल, बुक्का, अष्टगंध

नारळ : ६

सोन्याची तार (शलाका)

पावशेर तांदळाचा शिजविलेला भात

चमचे -५

रांगोळी, मध, अत्तर

जानवीजोड १ (५ नग)

पंचरत्न

हळद घालून मळलेल्या कणकेचे दिवे १ मोठा व ८ लहान

पातेली - २

उदबत्ती, कापूर,वाती

सत्यनारायण पूजा असल्यास

आग्नेय कोप-यात खड्डा करुन ठेवणे २”x२”

हात पुसण्यासाठी नॅपकिन

घरचे देव, घंटा

सुपा-या १७५

सत्यनारायण प्रसाद

तोरण बांधण्यासाठी  खिळे ठोकून ठेवणे

फरशी पुसण्यासाठी फडके

सुई-दोरा

हळकुंडे १५

केळी : १२

नवीन खिळे -४

 

१ लिंबू

खारका १५

केळीचे खुंट ४, सुतळी

   

५ हिरव्या मिरच्या

बदाम : १५

सत्यनारायण फोटो

   

सर्व पूजा साहित्यासह पूजा केली जाईल

वास्तुशांत पुजेची माहिती डाऊनलोड करा