विविध पूजा / विधी

भूमिपूजन

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःचे घर किंवा वास्तु होणे हा एक महत्वाचा टप्पा असतो. जर आपण स्वतः प्लॉट घेऊन बांधकाम करुन घेत असाल तर सरकारी परवानग्या, प्लॅन पास होणे इ. सोपस्कार पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्यापूर्वी त्याठिकाणी भूमिपूजन करणे आवश्यक असते.

पृथ्वीला आपण ‘धरणीमाता’ मानतो आणि तिच्या पाठीवर बांधकाम करत असताना, खड्डे खणताना तिला त्रास होईल. म्हणून तिची क्षमा मागून तिची व तिला तोलून धरणा-या अनंत आणि कूर्म यांचे आशिर्वाद घेऊन काम सुरु केल्याने बांधकाम निर्विघ्नपणे पार पडते अशी भावना ह्या पूजेमध्ये व्यक्त होते.

गणपती पूजन, वरुण पूजन व पृथ्वी - कूर्म - अनंत ह्या देवतांची पूजा झाल्यावर कुदळ-फावडे, घमेले इ. हत्यारांची पूजा केली जाते. त्यानंतर कोणी मान्यवर व्यक्ती अथवा ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते भूमिची पूजा करुन नारळ फोडून त्यांच्या हस्ते पाच घाव घालून कामाला सुरुवात केली जाते.

बांधकाम झाल्यानंतर काही तोडफोड करण्यापेक्षा प्लॅन करत असतानाच किंवा फ्लॅटची निवड करतानाच वास्तुशास्त्र सल्ला घेतल्याने नंतरचा मनस्ताप व वाढीव खर्च वाचू शकतो. मात्र ह्यासाठी खात्रीशीर वास्तुशास्त्र तज्ञाकडून सल्ला घेणे उपयुक्त ठरते. शास्त्रशुद्ध वास्तुशास्त्र विषयक सल्ल्यासाठी संपर्क साधा.

या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)

हळद, कुंकु, गुलाल

जानवीजोड

रांगोळी

उदबत्ती

नारळ ५

तांदूळ १ कि.

सुपाऱ्या १०

गूळ खोबरे

हळकुंडे ५, बदाम ५

खडीसाखर, पेढे

खारका ५

वस्त्र (ब्लाऊजपीस) १

सुट्टे पैसे १० नाणी

कुदळ, फावडे

तेल,तुप,

घमेले

वाती, फुलवाती

टोपी

काड्यापेटी

हात पुसण्यासाठी वस्त्र किंवा नॅपकिन २

केळी ६

चौरंग १

फळे ५

पाट किंवा आसने ३

सुट्टी फुले

समई

हार ४

निरंजन

बेल, दुर्वा, तुळशी

पळी भांडे

विड्याची पाने २५

कलश २, ताम्हण २

आंब्याचे डहाळे

स्टील ताटे / ट्रे २

घंटा

वाट्या ८

सर्व पूजा साहित्यासह पूजा केली जाईल

भूमिपूजन माहिती डाऊनलोड करा