गृहप्रवेश बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वास्तुशांत करुन घरामध्ये प्रवेश करणे कधीही श्रेयस्कर ठरते. परंतु काही वेळा काही कारणास्तव वास्तुशांत करणे शक्य नसेल परंतु नवीन घरामध्ये रहाण्यास जाणे अत्यावश्यक असल्यास कलशपूजन/ गृहप्रवेश करुन नवीन घरात रहाण्यास जावे.
चांगल्या मुहुर्तावर गणपतीपूजन व कलशपूजन करुन मंगल वाद्य व गुरुजींच्या मंत्रघोषात गृहप्रवेश केला जातो. त्यानंतर शेगडीची पूजा करुन दूध उतू घालवले जाते. दूध उतू जाणे (फक्त पूजेच्या दिवशी, दररोज नव्हे) हे समृद्धीचे प्रतिक समजले जाते. नंतर शक्य असल्यास काही गोड पदार्थ शिजवावा व त्या दिवशी नवीन वास्तुमध्येच मुक्काम करावा. मात्र नंतर लवकरात लवकर वास्तुशांत करणे आवश्यक असते.
या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)
© Copyright 2017 | All Rights Reserved | Powered by COSMIC