काही कारणास्तव वास्तुशांत करणे शक्य नसल्यास अथवा घरामध्ये काही अघटित दुःखद घटना घडल्यानंतर वास्तुच्या शुद्धीसाठी उदकशांत केली जाते. ह्या पूजेमध्ये धुपाने निर्जंतुक केलेल्या कलशाची षोडशोपचार पूजा करुन घरातील बाधा, शाप, रोगराई इ. दूर होऊन सुख-शांति नांदावी अशा अर्थाचे मंत्र म्हटले जातात. त्या कलशातील पाणी घरातील सर्वांच्या अंगावर शिंपडले जाते व तीर्थ म्हणून सर्वांना दिले जाते. घरातील अशुभ उर्जा दूर करुन शुभ उर्जा प्रवाहित करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. वर्ष-सहा महिन्यांतून एकदा घरात उदकशांत केल्याने घरात कायम सुख-शांति व आरोग्य रहाते.
या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)
हळद, कुंकु, गुलाल |
तांदूळ - २ कि. |
चौरंग - १ |
अष्टगंध, रांगोळी |
गूळ –खोबरे |
पाट / आसने - ६ |
उदबत्ती , कापूर |
साखर -१ वाटी |
समई , नीरांजन -२ |
नारळ : २ |
पंचामृत १ वाटी |
समई , नीरांजन -२ |
सुट्टे पैसे : २५ नाणी |
सुट्टी फुले , हार |
तांब्या/कलश - २ |
सुपा-या :१५ बदाम : ५ |
बेल ,दूर्वा , तुळशी |
ताम्हण - २ |
हळकुंडे :५, खारका :५ |
विड्याची पाने : २५ |
पळी-भांडे -२ |
धोतर, उपरणे |
आंब्याचे डहाळे |
स्टील ताटे - २ |
ब्लाऊजपीस २ |
फळे : ५ , केळी |
वाट्या/द्रोण - १० |
कोळसे व धूप किंवा धूपकांडी१ बॉक्स, धूपदाणी |
|
© Copyright 2017 | All Rights Reserved | Powered by COSMIC