विविध पूजा / विधी

जननशांति / नक्षत्रशांति

आपल्या घरामध्ये नवीन बाळाचे आगमन होणे हा सर्व कुटुंबियांसाठी एक अविस्मरणीय असा आनंदाचा क्षण असतो. हे बालक दीर्घायुषी, आरोग्यसंपन्न व बुद्धीमान व्हावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ह्यासाठी पालकांच्या प्रयत्नांसोबतच बालकाच्या कुंडलीतील ग्रह व इतर गोष्टीसुद्धा अनुकुल असणे आवश्यक असते. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे काही योग असे सांगितलेले आहेत की त्यावर जन्म झालेल्या बालकाला तसेच बाळाच्या पालकांना काही संकटांना सामोरे जावे लागते. परंतु त्या त्या योगांची विधिवत जननशांत केली असता संकटांची तीव्रता तर कमी होतेच परंतु बाळाला उत्तम आरोग्य व बुद्धिमत्ता सुद्धा लाभते. यापैकी काही महत्वाचे योग पुढील प्रमाणे.

तिथी : अमावस्या , कृष्ण चतुर्दशी (अमावस्येचा आदला दिवस), क्षयतिथी
योग : वैधृति, व्यतीपात व भद्रायोग किंवा विष्टि

नक्षत्र

अश्विनी नक्षत्राची फक्त पहिली ४८ मिनिटे

चित्रा (फक्त प्रथम व द्वितीय चरण)

पुष्य ( फक्त द्वितीय आणि तृतीय चरण)

विशाखा (फक्त चतुर्थ चरण)    

आश्लेषा (पूर्ण नक्षत्र)

ज्येष्ठा (पूर्ण नक्षत्र)

मघा (फक्त प्रथम चरण)

मूळ (पूर्ण नक्षत्र)

उत्तरा (फक्त प्रथम चरण)

पूर्वाषाढा (फक्त तृतीय चरण)

 

रेवती (शेवटची ४८ मिनिटे)

याव्यतिरिक्त ग्रहण पर्वकाळ, सूर्य संक्रमण पुण्यकाळ, दग्ध, यमघंट, मृत्युयोग यांवर जन्म झाल्यास तसेच यमल म्हणजे जुळे, सदंत म्हणजे दातासहित बालक जन्माला आल्यास, अधोमुख जन्म झाल्यास शांत करावी. तसेच आई, वडिल, बहिण, भाऊ यांच्यापैकी एकाच्या जन्मनक्षत्रावर जन्म झाल्यास ‘एक नक्षत्र जनन’ व तीन मुलींवर मुलगा अथवा तीन मुलांवर मुलगी झाल्यास ‘त्रिक् प्रसव’ (जे सध्या क्वचितच घडू शकते) ह्या शांति कराव्यात.

काही मिनिटांच्या फरकाने नक्षत्र अथवा योग बदलत असल्यामुळे कोणतीही शांत करण्यापूर्वी अचूक गणिताने काढलेली जन्मपत्रिका जाणकार ज्योतिषी अथवा आपल्या कुलोपाध्याय (गुरुजी) यांना दाखवून त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

शास्त्रोक्त पद्धतीने जननशांति करण्यासाठी व अचूक जन्मपत्रिका (कुंडली) काढण्यासाठी संपर्क साधा. dhereguruji@gmail.com अथवा +919822865216 तसेच काही कामांमध्ये अडचणी येत असल्यास जन्मनक्षत्र,वार, तिथी यांच्याही शांति कराव्यात.

जननशांति / नक्षत्रशांति माहिती डाऊनलोड करा