आपण केलेल्या गंगास्नान, समुद्रस्नान व तीर्थयात्रेचे संपूर्ण पुण्य लाभावे याकरिता गंगापूजन केले जाते. पूर्वीच्या काळी प्रवासाची साधने व रस्त्यांच्या सुविधा नसल्यामुळे तीर्थयात्रेला गेलेली व्यक्ती सुखरुप परत येणे जरा अवघड होते. त्यामुळे सुखरुप यात्रा पूर्ण झाल्याबद्दल मित्रमंडळी, आप्तेष्ट , नातेवाईक यांना बोलावून यात्रेचा प्रसाद देणे हे मुख्य प्रयोजन होते.
संकल्पपूर्वक गणपतीपूजन , पुण्याहवाचन करुन गंगेच्या पाण्याने भरलेल्या कलशाची षोडशोपचार पूजा करावी. गंगेची ओटी भरावी.
ब्राह्मण व सुवासिनींना वस्त्र, सौभाग्यवायन द्यावे. ह्यानंतर तीर्थयात्रेहून आणलेला प्रसाद, गंगेचे कलश इ. वस्तू सर्वांना द्याव्यात.
गंगापूजन साहित्याची साधारण यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)
हळद |
कुंकु |
गुलाल |
बुक्का |
रांगोळी |
नारळ २ |
तांदूळ १ किलो |
गूळ खोबरे |
खडीसाखर |
पेढे |
सुपाऱ्या १० |
हळकुंडे ५ |
बदाम ५ |
खारका ५ |
तेल वाती |
कापूर |
उदबत्ती |
काड्यापेटी |
अत्तर |
केळी |
फळे ५ |
फुले |
बेल |
दुर्वा |
तुळशी |
हार २ लहान |
विड्याची पाने २५ |
आंब्याचे डहाळे |
चौरंग १, पाट / आसने ३ |
समई |
निरंजन |
पळी भांडे |
तांब्या |
ताम्हण |
स्टील ताटे २ |
वाट्या ६ |
सुट्टे पैसे १० नाणी |
घंटा |
पंचामृत ( दही, दूध, तूप, साखर, मध ) |
प्रसाद |
ब्लाऊजपीस २ |
काठ-पदराची साडी १ |
सौभाग्य वायन (मणी, मंगळसूत्र, फणी-करंडा, बांगड्या इ.) |
जानवीजोड |
© Copyright 2017 | All Rights Reserved | Powered by COSMIC